जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समितीला अर्ज करण्याचे आवाहन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 8 डिसेंबर 2021
ठाणे व पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार व इतर न्यायालयांमध्ये 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष एन.के ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेदहा वाजता ही राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला सर्व पक्षकारांनी अर्ज करावा, असे आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सेवा सदन पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर ठाणे,येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 022-25476441 यावर संपर्क साधावा. सर्व प्रकरणे सामंजस्याने सोडवण्याकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचा आवश्यक लाभ घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, 138 एन. आय.एक्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा.
राष्ट्रीय लोक अदालतीबाबत चौकशीसाठी सोबतच्या क्रमांकावर संपर्क साधावा: वाशी (नवी मुंबई, जिल्हा ठाणे) – 022-27580082, भिवंडी – 02522-250828, कल्याण – 0251-2205770, मुरबाड – 02524-222433, शहापूर- 02527-2070776, उहासनगर- 0251-2560388, पालघर- 02525-256754, वसई – 0250-2325485, वाडा- 02526-272672, डहाणू – 02528-222160, जव्हार 02520-222565.
==================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप