पनवेलमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पनवेल, 7 डिसेंबर 2021

ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पनवेल तालुक्यातील रिक्त झालेल्या जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी जांभिवली, खानाव आणि कसळखंड या तीन ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.

पनवेल तालुक्यात होणार्‍या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जांभिवली ग्रामपंचायतीमधून सुप्रिया कृणाल निकम (पवार), खानाव ग्रामपंचायतीमधून उषा रोशन फराड व पूनम प्रकाश तवले आणि कसळखंड ग्रामपंचायतीमधून कांता चंद्रकांत मते व मनीषा सचिन पाटील या भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पनवेल तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी मुकेश कांबळे, राजेंद्र दत्तात्रेय कांबळे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री दिसले, उपसरपंच बाळाराम पाटील, जांभिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रिया कोंडिलकर, कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, प्रवीण ठाकूर, बूथ अध्यक्ष यशवंत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

===================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप