आपने आंदोलन करीत केंद्रला पाठवली “दिवाळी महाग” भेट
- अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
- नवी मुंबई, 2 नोव्हेंबर 2021
कोव्हीड महामारीच्या मंदीमधून कोलमडलेला सामान्य नागरिक कसाबसा कुटुंबाचा आर्थिक गाडा पूर्वपदापर आणण्यासाठी केविलवाणी धडपड करीत असतानाच, केंद्र आणी राज्य सरकार दोघांनी मिळून, पुन्हा पुन्हा पेट्रोल, डिझेल आणि गॅस च्या किमतीत भरमसाठ वाढ करीत, सामान्यांचे जगणे मुश्किल करून टाकल्याचा आरोप नवी मुंबई आपच्यावतीने करण्यात आला आहे. या भाववाढीचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई आपतर्फे 31 ऑक्टोबर रोजी तुर्भे नका येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारला महागड्या दिवाळीची उपहासात्मक भेट म्हणून कांदे, बटाटे, खाद्य तेल, गॅस आणी इतर जीवनाआवश्यक वस्तूंची भेट पाठविण्यात आली. तसेच सरकारच्या धोरणाविरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या.
विमानाच्या इंधनापेक्षा दोनचाकीचे इंधन महाग झाले आहे. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मुळे सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. बहोत हो गयी मंहगाई की मार! सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा मार मुकाट्याने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती दुसरे काय उरले आहे?
– प्रीती शिंदेकर – उपाध्यक्ष आणी वॉर्ड अध्यक्ष (ऐरोली),
निवडणुकी आधी लोकांना खोटा दिलासा देणारे, केंद्र आणी राज्य सरकार आता, पेट्रोल, डिझेल आणि गॅस च्या भरमसाठ वाढीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. ज्या सामान्य जनतेनी तुम्हाला गादीवर बसवले आहे , तीच जनता तुम्हाला गाडीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
– सुनील जाधव, सह सचिव युवा विभाग आणी वॉर्ड अध्यक्ष (तुर्भे),
एकीकडे केंद्र सरकार सामान्य माणसाला कोविड वॅक्सिंन मोफत देण्यासाठी पेट्रोल डिझेल च्या किमती वाढवल्याचे सांगत असतानाच केंद्र सरकारने याच कारणासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक व एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेकडून कर्ज घेतल्याची बातमी समोर आली.या घटनेवरून मोदी सरकार भारतीयांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न होते.
चिन्मय गोडे, सह सचिव युवा विभाग आणी वॉर्ड अध्यक्ष (नेरुळ).
कोविड नियमांचे पालन आणि २५ लोकांची अनुमती असल्याने आंदोलनाला कोविड प्रोटोकॉल सांभाळून कार्यक्रम झाला.