नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीला 25 हजार सानुग्रह अनुदान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13 ऑक्टोबर 2021

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावीयाकरिता यावर्षी महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना 25 हजार रुपये तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना 19 हजार रुपये आणि आशा वर्कर यांना 9 हजार रुपये रक्कमेचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा  प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी – कर्मचारी यांना 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना 19 हजार रुपये इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.

Other Video On YouTube

याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे 19 हजार  रुपये इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू. 9 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

Other Video On YouTube

एकूण 4582 अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली असून दिवाळीपूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या हातात मिळणार असल्याने त्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

इंटकच्या प्रयत्नांना यश- रविंद्र सावंत

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सानुग्रह अनुदान देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्तांशी चर्चा करीत होतो. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही आमच्या मागणीला अनुकूलता व्यक्त करीत लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आम्हाला दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान जाहीर केल्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्यावतीने आयुक्तांचे आभार मानतो, असे इंटकचे नेते रविंद्र सावंत यांनी सांगितले.

==================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप