ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू

प्रतिकात्मक फोटो

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, ८ सप्टेंबर २०२१

 येत्या काळातील सण उत्सव आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या काळात प्रतिबंध आदेश जारी केले असल्याचे ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह यांनी कळविले आहे.

पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालील कृत्यांना मनाई आदेश देण्यात आले आहेत.

Other Video On YouTUbe

त्यानुसार, शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहिर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इ. कृत्यांना या आदेशान्वये मनाई करण्यात आले आहे.

Other Video On YouTUbe

हे आदेश लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण यांना लागू नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे, पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी कळविले आहे.

—————————————————————————————————-

गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडया धावणार

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप