माजी नगरसेविका माधुरी सुतार यांचे महापालिका प्रशासनाला निवेदन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 1 जुलै 2021
सध्या कोरोना महामारीत आपल्या दैनंदिन गरजांसाठी नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र अशाप्रकारच्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने गर्दीच्या ठिकामी जंतूनाशक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असल्याचे दिसत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारात, दुकानात जाणे गरजेचे आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होवू लागली आहे. अशा गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भिती अधिक आहे. त्यामुळे सध्याच्या नवीन नियमावली नुसार सायंकाळी ४ नंतर मार्केट व दुकाने बंद होत आहे. मात्र गर्दी निर्माण झालेल्या ठिकाना वर जंतुनाशक फवारणी पालिकेने करावी जेणे करून कोरोना सारख्या तसेच इतर भयंकर रोगाचा फैलाव होण्यास आपल्याला संसर्ग रोखणे शक्य होईल, असे मत माधुरी सुतार यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी 29 जून रोजी आयुक्त अभिजीत बांगर आणि आरोग्य विभागाला एक निवेदन देत तातडीने सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी केली आहे.
=======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप