द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर यांची सिडको अधिकाऱ्यांसोबत चर्चा
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 23 जून 2021
वेगाने विकसित होणाऱ्या उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडला नागरी समस्यांचा विळख पडला असून पावसाळ्यात गटारे तुंबणे, रस्त्यांची दुरावस्था, वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी नागरिकांच्या विनंतीनंतर शिवसेनेचे द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
उरण तालुक्यातील द्रोणागिरी भागात मोठ्या प्रमाणात शहरीकऱण होत आहे. मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. मात्र गटारांची योग्य ती देखभाल होत नसल्यामुळे ती तुंबत आहेत. त्याचा परिणाम परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनदेखील महावितरण तसेच सिडको प्रशासन लक्ष देत नसल्याची तक्रार नागरीक करीत आहेत. याप्रकरणी सेक्ट 52,53,54,55 मधील स्थानिक नागरिकांनी शिवसेनेकडे धाव घेतली असून द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर यांनी तातडीने सिडको अधिकाऱ्यांना पाचारण केले. तसेच शहरातील नागरी समस्या सोडविण्याबाबत तातडीने पावले उचलावीत अशी विनंती केली आहे.
Othr Video On Youtube
सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही परिसराची पाहणी करून लवकरात लवकर गटारांची साफसफाई तसेच इतर कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिल्याचे द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर यांनी सांगितले.
पाहणी दौऱ्यावेळी सिडकोचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, युवासेना अधिकारी करण पाटील, प्रतिक पाटील, धनंजय शिंदे, रमेश पवार, सोमनाथ भोईर, रुपेश पाटील, विष्णु जाधव, बाजी घोडके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
=======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप