23 जून रोजी नवी मुंबईचा सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 जून 2021

मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम 23 जून रोजी तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात 23 जून रोजी  संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच 24  जून रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असेही महापालिकेने कळविले आहे.

तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

========================================================

  • मागील बातम्यावरही दृष्टिक्षेप