- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 12 जून 2021
नवी मुंबई परिसरात सध्या संततधार पाऊस सुरू असून नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील किल्ले जंक्शन भागात असलेल्या बेलापूर किल्ल्याच्या टेहळणी बुरूजाचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र बुरुजाची माती तसेच इतर भाग रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबल्याची माहिती महापालिकेच्या आपतकालीन विभागाकडून देण्यात आली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाला आहे.
स्रोत – सोशल मिडिया व्हायरल फूटेज
नवी मुंबईत सकाळपासून गडगडाटासह पाऊस सुरू आहे. संततधार पाऊस कोसळत असून सकाळी नऊ पासून दुपारी १ या चार तासांत 26 पूर्णांक 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दुपारी सव्वाच्या सुमारास महापालिका मुख्यालयासमोर असणाऱ्या किल्ले गावठाण परिसरातल्या बेलापूर किल्ल्याच्या टेहाळणी बुरूजाचा काही भाग पावसामुळे कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र नवी मुंबई परिवहनच्या बसचं काही प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. सध्या या बुरूजाच्या संवर्धनाचे काम सुरू आहे.
==================================================
- मागील बातम्यावरही दृष्टिक्षेप