- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १४ मे २०२१
नवी मुंबई महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीविषयी व आश्वासित प्रगती योजनेबाबतच्या कार्यवाहीबाबत कामगारांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे या दोनही विषयाचे भिजत घोंगडे तसेच पडलेले होते. मात्र हे दोन्ही प्रश्न आता मार्गी लावल्याबाबत काँग्रेस नेते आणि नवी मुंबई इंटकचे जिल्हाध्यक्ष रविद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेवून आभार मानले.
- कर्मचाऱ्यांच्या आरोग्य जपा – सावंत
कोव्हिड काळात तसेच इतर वेळीही नवी मुंबईकरांना नागरी सुविधा मिळाव्यात तसेच नागरी समस्यांचे निवारण व्हावे यासाठी कायम, तसेच ठोक मानधनावरील व अन्य आस्थापनेतील सर्वच कामगार अहोरात्र परिश्रम करत असतात. या कामगारांच्या व त्यांच्या परिवाराच्या जिविताची काळजी घेणे हे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. महापालिकेत काम करणाऱ्या सर्वच कामगारांना व त्यांच्या परिवाराला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा क्रांतीकारी निर्णय आपण लवकरात लवकर घेवून महापालिका कामगारांना दिलासा देणे आवश्यक आहे. तसेच ही आरोग्य सुविधा कॅशलेस स्वरूपाची असावी, जेणेकरून कामगार आणि त्यांच्या कुटुंबाची अडचण होवू नये ही आमची प्रमुख मागणी असल्याचे रविंद्र सावंत यांनी आयुक्तांना भेटीत केली.
=======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप