2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणीला मान्यता

मेसर्स भारत बायोटेक 525 निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 13 मे 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विरोधातील लस लहान मुलांना देण्याबाबतच्या कार्यवाहीला वेग आला आहे. राष्ट्रीय नियामक, भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी  सर्व बाबींची योग्य विषय तज्ञ समिती (एसईसी) ची शिफारस मान्य केली आहे. त्यानुसार १२ मे रोजी लस उत्पादक भारत बायोटेक लिमिटेडला 2 ते  18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन (कोविड प्रतिबंधक लस ) ची  दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्यासाठी  परवानगी दिली आहे.

मेसर्स भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड, हैदराबाद (बीबीआयएल) ने 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन ची  दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. 525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येईल. या चाचणीत 0 दिवस  आणि  28 दिवस  दरम्यान लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

जलद नियामक प्रतिसाद म्हणून, हा प्रस्ताव विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) (कोविड -19) कडून  11 मे 2021  रोजी विचारात घेण्यात आला. समितीने तपशीलवार विचारविनिमयानंतर प्रस्तावित टप्पा दोन / तीन च्या मानवी चाचणीला सशर्त परवानगी देण्याची शिफारस केली.

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टक्षेप