अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 1 एप्रिल 2021:
सिडको महामंडळाच्या उलवे येथील नागरी आरोग्य केंद्रात बुधवार 31 मार्च 2021 पासून कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेत, एका सत्रात 50 व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.
31 मार्च 2021 पासून नागरी आरोग्य केंद्रात आणि जवळपासच्या गावांतील नागरिक तसेच सिडको कर्मचाऱ्यांना कोविड-19 विरोधी लस देण्यात येणार आहे. तसेच लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम जाणवल्यास उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्थाही सदर केंद्रावर करण्यात आली आहे. तरी उलवे नोड व जवळपासच्या गावांतील अधिकाधिक नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
——————————————————————————————————