आपल्या कन्येच्या नावासह वृक्षारोपण करीत आयुक्तांचा बालिका व वृक्ष संवर्धनाचा संदेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २७ जानेवारी २०२१

नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने २१ ते २६ जानेवारी  या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय बालिका सप्ताहाची सांगता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह इतर अधिकारी यांच्या हस्ते आपापल्या कन्येच्या नावासह वृक्षारोपण करून पार पडली. नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे वसुंधरा अभियान अंतर्गत हा कार्यक्रम झाला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील, उपआयुक्त मनोजकुमार महाले, उपायुक्त बाबासाहेब राजळे, योगेश कडुस्कर, श्रीराम पवार, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड व मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

  • Other Video on Youtube

२४ जानेवारीरोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बालिका कल्याण विषयक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २३ जानेवारी रोजी PCPNDT आणि MTP या कायद्यांविषयी आयोजित मार्गदर्शनपर वेबिनारमध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांनी माहितीपूर्ण विवेचन केले. २४ जानेवारी रोजी डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी मासिक पाळी काळातील स्वच्छता आणि आरोग्य याविषयी वेबसंवाद साधला. २५ जानेवारी रोजी विविध योजनांचा किशोरवयीन मुलींवरील प्रभाव याविषयी वेबिनारमधून  स्वप्नाली चौधरी यांनी प्रकाशझोत टाकला.

  • Other Video on Youtube


याशिवाय २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोव्हीड काळात उल्लेखनीय काम करणा-या आरोग्य व स्वच्छता विभागातील ५  महिला कर्मचा-यांचा ध्वजारोहणानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

=================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप