काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची धडक मागणी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १९ जानेवारी २०२१
लोकसभा व विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले आहे. किमान महापालिका निवडणूकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष या शहरात जिवंत ठेवायचा असेल तर निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याना संधी मिळालीच पाहिजे. त्यामुळे तिकीट वाटपात काँग्रेसला मान-सन्मान मिळणार नसेल तर स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची मागणीही यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांयकाळी नेरूळ सेक्टर दोनमध्ये अभिनंदन हॉलमध्ये नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा उज्जवला साळवी, काँग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक तारीख फारूखी, शितल म्हात्रे, विनिता बोरा, राजेश जाधव, नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत नेरूळ ब्लॉकमध्ये काँग्रेस पक्षसंघटनेचा आढावा घेताना वरिष्ठांकडून कायकर्ते व पदाधिकारी यांची मनोगते जाणून घेतली.
महाविकास आघाडी जागावाटपात काँग्रेस पक्षाला दोन जागा सोडत असेल तर नेरूळ पश्चिमचे काय? असा प्रश्न विचारताना कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद असेल तेथील कार्यकर्त्यांना संधी मिळालेच पाहिजे. आघाडीमध्ये काँग्रेसचाही विचार झाला पाहिजे, अन्यथा काँग्रेसमध्ये कार्यकर्ता टिकणार नाही. महाविकास आघाडीत काँग्रेसलला मानसन्मान भेटत नसेल निवडणूका स्वतंत्रपणे लढवाव्यात असा सूरही यावेळी कार्यकर्त्याकडून आळविण्यात आला.
नेरूळ पश्चिमला रवींद्र सावंत हे गेल्या काही वर्षापासून काँग्रेसचे आक्रमकपणे कार्य करत आहेत. आंदोलनातून काँग्रेसचे अस्तित्व टिकवून आहेत. नेरूळ पश्चिमला काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर जुईनगर, नेरूळ, शिरवणे, दारावे, नेरूळ सेक्टर 10, 16, 18 येथील प्रभागातून काँग्रेसने निवडणूक लढवावी अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.
कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा योग्य तो विचार केला जाईल, इच्छूकांनी आपली नावे पक्षाकडे द्यावीत आणि आपल्या विभागात पक्षाची मिटींग लावावी अशी भूमिका घेत जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आणि पक्षाचे प्रदेश चिटणिस संतोष शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा यावेळी प्रयत्न केला.
माजी नगरसेविका मिरा पाटील, नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, सेवादल अध्यक्ष राजगोपाल, अन्वर हवलदार, महेश भंणगे, दिगंबर राऊत, संतोष सुतार, आर.के.नायर, एस.कुमार, बारवे, विजय कुरकुटे,दिनेश गवळी, अनिल हेगडे, कृष्णा पुजारी, दयानंद शेट्टी, शांताराम शेट्टी, भोलासिंग, तुकाराम कदम, सोनवणे,शाम पाटील, डॉ. नुरी, संध्या कोकाटे, शेवंता मोरे आदी उपस्थित होते.
या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन व आभार नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केले.
========================================================
- मगील बातम्यांवरही दृष्टिक्षेप