भाजपा वार्ड अध्यक्ष कैलास तरकसे यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी दाखले शिबिर सप्ताहाचे आयोजन

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, २२ डिसेंबर २०२०

भाजपचे सीवूड येथील विभाग अध्यक्ष कैलास तरकसे यांच्या वाढदिवसानिमित्त सीवूड, सेक्टर ४४ येथे २८ डिसेंबरपर्यंत सरकारी दाखले शिबीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दिली.

विविध सरकारी कामकामाजात लागणारे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना अनेकदा अडचणी येतात. अशावेळी एका छताखाली विविध प्रकारचे सरकारी दाखले नागरिकांना मिळावेत,यासाठी तरकसे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सीवूड सेक्टर ४४ मधील साई समर्थ अपार्टमेंट, प्लॉक क्रमांक १४९ येथील दुकान क्रमांक ६ येथील महा ई सेवा केंद्र येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या काळात नागरिकांना या शिबारात दाखले मिळवून देण्यात येणार असल्याचे भरत जाधव यांनी सांगितले.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विनायक गिरी, सुधीर जाधव,  संदीप कुलकर्णी,  प्रतिक्षा विनायक गिरी,  पल्लवी सुधीर जाधव,  बालिका कैलास तरकसे, जयवंत तांडेल, दत्ता घंगाळे, भालचंद्र वाडकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टीक्षेप