भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत जाधव यांचा पुढाकार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- १७ डिसेंबर २०२०
महाराष्ट्रात कोरोनावर मोफत उपचार करणाऱ्या जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत जाधव यांच्या पुढाकाराने विनस मास्क कंपनी व इतर दात्यांच्या मदतीने १५ डिसेंबर रोजी ५००० सलाईन २००० सलाईन नीडल व इतर औषध अशा प्रकारचे दोन लाख रुपयांचे साहित्य भेट दिले. या आरोग्य प्रकल्पाला आतापर्यंत दहा लाख रुपयांपेक्षा जास्त साहित्य भेट देण्यात आल्याची माहिती भरत जाधव यांनी दिली.
यावेळी भरत जाधव यांच्यासह उद्योगपती रमेश आजबे, मनोज कुलकर्णी, युनूस सय्यद, अनिल यादव, नगरसेवक डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, बिभीषण धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
======================================================
- मागील इतर बातम्यांवरही दृष्टीक्षेप