माजी नगरसेवक विशाल डोळस यांचे महिला बचत गटांना प्रोत्साहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ८ नोव्हेंबर २०२०

सीवुड सेक्टर ४८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिला बचतगट मेळाव्याला भेट देवून माजी नगरनसेवक विशाल डोळस यांनी महिलांचा उत्साह वाढविला. यंदाच्या दिवाळीत या महिला बचत गटांकडून वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दयावे असे आवाहनही डोळस यांनी केले.

कोरोनाच्या संकटामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांना पुन्हा उभारी देण्याकरिता आणि बचत गटातल्या महिलांच्या रोगगार निर्मितीसाठी नेरूळ सेक्टर ४८ मधील गणेश मैदानात ७ नोव्हेंबर रोजी महिला बचतगट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या बचतगट मेळाव्यात प्रज्ञा महिला बचतगट, शिल महिला बचतगट, करुणा महिला बचतगट, यशोधरा महिला बचतगट, समृद्धी महिला बचतगट, वसुंधरा महिला बचतगट, जिजाऊ महिला बचतगट,संजीवनी महिला बचतगट,प्रतिक्षा महिला बचतगट, आम्रपाली महिला बचतगट,संसकृती महिला बचतगट,शिवाई महिला बचतगट,प्रेरणा महिला बचतगट, गौतमी महिला बचतगटांनी सहभाग नोंदवला होता. या मेळाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

  • या मेळाव्यात महिला बचत गटांनी दिवाळीनिमित्त कपडे,आर्टिफिशियल दागिने, कंदील, दिवे, रांगोळी, घरगुती उपकरणे, साड्यांचे विविध प्रकार, गोड पदार्थ, दिवाळी फराळ, भेटवस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. या मेळाव्याला भेट देवून नागरिकांनी वस्तू खरेदी करून बचत गटांना आर्थिक सक्षमतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन विशाल डोळस यांनी केले.

या मेळाव्याला परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या मेळाव्यासाठी राम झेंडे, मिता गंगावणे, रंजना कांबळे आणि इतरांनी परिश्रम घेतले.

===================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा