सानपाडा येथील मंदिरासमोर भाजपचे घंटा नाद आंदोलन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १३ ऑक्टोबर २०२०

दार उघड उद्धवा दार या अभियानांतर्गत भाजपाच्या वतीने आमदार गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सानपाडा सेक्टर 5 येथील श्री दत मंदिरासमोर ‘घंटा नाद आंदोलन करण्यात आले.कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेवून या आंदोलनाच्या वेळी सोशल डिस्टस्निंगचे पालन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देत मंदिरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. चालू करा,चालू करा मंदिरे चालू करा अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

  • संसार उध्यस्थ करणारी दारूची दुकाने महसूलसाठी सुरू करता आणि आध्यात्मिक ताकद देणारी, संस्काराचा वारसा जोपासणारी मंदिरे मात्र आजही कोरोनाच्या नावाखाली सरकार बंद ठेवत असल्याचा संताप समाजसेविका शैला जगदीश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
  • या आंदोलनात भाजपा उत्तरभारतीय मोर्चा नवी मुंबई अध्यक्ष राजेशजी राय यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवक भाऊ भापकर , समाजसेवक सुनिल कुरकुटे, समाजसेवक गणेश कमळे , समाजसेविका मंदाकिनी कुंजीर , भालचंद्र पाटील ,अशोक कवडे ,नितीन भोर , सचिन मोरडे , शशिकांत वाळुंज , पिनु पैठणकर , केतन ढोंबरे ,अंकीत आंबूलकर , विक्रम कानसकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा