एपीएमसीच्या ७२ हजार माथाडी कामगारांचे काय होणार – आपचा सवाल
कृषी विधेयकाचा काळी पट्टी बांधून जाहीर निषेध
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २४ सप्टेंबर २०२०
केद्र सरकारने मंजूर केलेल्या सुधारीत कृषी विधेयकाचा शेतकऱ्यांनाच नव्हे तर कृषी मालाशी निगडीत हजारो माथाडी कामगार, व्यापारी वर्ग तसेच इतर घटकांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. त्यामुळे या सुधारीत कृषीविधेयकाचा निषेध करण्यासाटी आम आदमी पक्षातर्फे आज वाशी येथील शिवाजी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थिती लावली.
- केंद्र सरकारने नुकत्याच ज्या असंवैधानिक पद्धतीने, लोकशाहीची हत्या करुन शेतकऱ्यांच्या विरोधात व कारपोरेटच्या हिताची तीन विधेयक मंजूर केले. सरकारी संस्थांना पहिले वाऱ्यावर सोडून ,त्यांना खिळखिळी करणे आणि मग त्याचे विलगिकरण करून ती खाजगी संस्थाना विकणे हाच व्यवसाय सध्या सरकारने सुरु केलाय. “एक तरी सरकारी संस्था दाखवा जिथे, या सरकारने दैदीप्यमान कामगिरी करून सरकारी सेवा उत्कृष्ट प्रतीच्या बनवल्या आहेत ” असा सवाल प्रीती शर्मा मेनन यांनी केला.
- सरकाने शेतकरी बिला संदर्भात चर्चेविना केलेली उठाठेप शंकेची वाटते, कित्येक वर्षांपासून स्वामिनाथन समितीची मागणी अजून हि अमलात आलेली नसताना सरकारने हे नवीन विधेयक ज्या पद्धतीने मंजूर केले हे खरोखरच लोकशाहीचा पाठीत खंजर खुपण्यासारखे आहे. एकूणच केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने जात असल्यामुळे किसान विरोधी विधेयकाचा आम आदमी पक्षाने राज्यभर निषेध करत आहे असे मत पक्षाचे नवी मुंबई संयोजक प्रमोद महाजन यांनी मांडले
या आंदोलनाला ठाणे, पनवेल येथील पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये नवी मुंबई च्या उपसंयोजक मलिका सुधाकर, महिला अध्यक्ष प्रीती शिंदेकर, उपाध्यक्ष सुलोचना शिवानंद, न्यायिक कमिटीच्या सचिव सुवर्ण जोशी यांनी आपला निषेध नोंदवला. सोबत रूपक तिवारी, ताहीर पटेल, झाकीर कुरेशी, चिन्मय गोडे, सुमीत कोटीयन,अवंतिका माथूर, मनमोहन सिंग, हरमीत सिंग, रमेश गुप्ता, अब्दुल अजीज आणि इतर मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सामील झाले होते.
===================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा