आपतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : आम आदमी पक्षाने आपल्या कार्यकत्यासोबत कोपरखैरणे डम्पिंग स्टेशन येथील सफाई कामगारांची भेट घेवून त्यांचे आभार मानले. सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ स्वच्छता कर्मचारी ह्यांचा खऱ्या अर्थाने स्वच्छ नवी मुंबई ला ३ ऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळण्यात सिंहाचा वाटा आहे आणि त्यासाठी आप आदमी पक्ष आणि समस्त नवी मुंबई कर आपल्या समोर कृतज्ञ आहोत असे सांगत नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या सपाई कामगारांचा पुष्पगुच्छ देवून नवी मुंबई आपतर्फे गौरव  करण्यात आला.

या उपक्रमाचे अनुमोदन पक्षाचे नवी मुंबई संयोजक प्रमोद महाजन  आणि पक्षाचे खजिनदार रुपक तिवारी यांनी केले.

यावेळी नव निर्वाचित महिला आघाडीचे उपसंयोजक सुलोचना, न्यायिक समितीच्या सेक्रेटरी  सुवर्ण जोशी, ठाणे युवा आघाडीचे अध्यक्ष ताहीर पटेल, सुभाष कोटीयन ,  नवी मुंबई युवक आघाडीचे उपाअध्यक्ष सुमित कोटियान यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

बिजू शाह (पूर्व भारत समिती अध्यक्ष ),अब्दुल अजीज (आयटी समिती उप खजिनदार ),झाकीर हुसैन (सामाजिक माध्यम अध्यक्ष ), प्रकाश मंडल यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा