कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करा अन्यथा आंदोलन करू

नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांचा इशारा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ३० जुलै २०२०

कोरोनाच्या आजारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल झालेले आहेत. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे उद्योगधंदे ठप्प पडले असून नागरिकांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या या भिषण काळात नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी विद्युत बिले माफ करण्याबाबत तसेच लॉकडाउनचे नियम शिथिल करून उद्योगधंदे सुरु करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि नवी मुंबई सामाजिक पूनर्वसन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांनी केली आहे. याप्रकरणी शासनाने त्वरीत ठोस निर्णय न घेतल्यास वाशी ते बेलापूरदरम्यान लाँगमार्च आंदोलन करण्याचा इशारा दशरथ भगत यांनी दिला आहे.

कोरोना प्रक़ोपात नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ३ प्रमुख मुद्यांविषयी नागरिकांच्या मनातील तळमळ या  निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत असल्याचे दशरथ भगत यांनी स्पष्ट केले.

१) विद्युत बिले माफ करावी

भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अंतर्गतच्या कायदयाने गेले ४ महीने नागरीक घरातच बंदीस्त आहेत. त्याचा परिणाम लाखो  नागरिकांचे पूर्ण रोजगार संपुष्टात आले असून आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.

  1. नागरिकांना देण्यात  आलेल्या बिलात ५०० युनिट्स पर्यंत  सरसकट माफ करणे .
  2. ५०० युनीच्या वरील वाढीव बिल मध्ये ५० % सूट द्यावी. अथवा मागिल डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रूवारी महिन्यातीलच बिल गृहीत धरून त्यावर ५०%  सरसकट सूट देणे.
  3. ज्या ग्रहाकांना ऑनलाइन मुळ बिल दिले आहे आणि ग्राहकांनी ते ऑनलाइन पेमेंट केलेही आहे. परंतु त्यांना  नंतर पुन्हा वाढीव बिल दिली आहेत ती त्वरित रद्द करावी.
  4. ज्या ग्राहकांनी बिल भरलेली आहेत अशा ग्राहकांना मुद्दा क्रमांक a आणि b नुसार लागू करुन पुढील बिलातुन वजावट (adjustment )करावी .
  5. बिल पेमेंट भरने हे ३ हप्त्यात (टप्यात) करणे.
  6. नागरीकांची आर्थिक स्थिति रुळावर येत नाही तो पर्यंत विद्युत पुरवठा खंडित करु नये.


२)अर्थ व्यवस्था

रोजगार न करु शकलेले, रोज़गार गमावलेले आणि नवीन रोजगार शोधार्थी असे अकुशल, अर्ध कुशल, कुशल आणि व्यापारी, उद्योजक अशा या विविध लाखों श्रमिकांवर आता भूख बळी आणि प्रसंगी आत्महत्या  होण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

  1. पार्ट लॉकडाऊन सहित  पूर्णता: रद्द करावे अर्थात बीगेन आनलॉक, हॉट स्पॉट, p१ p२ आणि ठराविक वेळ असे काहीही बंधन नसावे.
  2. रहिवास संकूल अथवा इमारतीमधील  कोरोना पॉझिटिव्हबाधित फ्लॅट अथवा रूम या व्यतिरिक्त पूर्ण ईमारत/संकुल बंदिस्त करु नये. ज्या अर्थी त्या लाखो श्रमिकांना स्वतःच्या रोजगारापासून आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना त्या सेवांपासून वंचित ठेऊ नये .

३) कोरोना उपचार

ठीक ठिकाणचे रस्ते बंधिस्त केल्याने आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेवर परिणाम होत आहे , तरी सर्व रस्ते खुले  करावे. नागरीकांना मूलभूत जगण्याचे हक्क प्रधान करा आणि कोरोना व इतर आजारांच्या उपचार करीता प्रथम  हॉस्पिटल मध्ये  बेडची संख्या वाढवावी . 

  1. दैनंदिन  कोविड भय रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. त्या ऐवजी दिलासा दायक  ( PDF ) रिपोर्ट रोजच्या दिवसातून ३ वेळा प्रसिद्ध करावे.  ज्यामध्ये कोविड व नॉन कोविड रुग्णांना उपलब्ध असलेले व केलेले उपचार बेडची संख्या पुढील प्रमाणे अशी की ,  डिस्पेन्सरी, रहिवासी आणि  कमर्शिअल,  स्वतंत्र  भूखंड, वैद्यकीय महाविद्यालय आणि महानगरपालिका या सर्व हॉस्पिटलमधील उपचार बेडची शिल्लक  स्थिती दर्शकता दर्शवावी. ज्याअर्थी बाधित न झालेले १५ लाख नागरीकांना उपचाराची शाश्वती मिळेल तसेच बाधित झालेले हजारो नागरीकांना दिलासा मिळेल. अशा या दोन्ही घटकांच्या  प्राण  व आरोग्याचे  रक्षण   तसेच   आर्थिक  सक्षम  होण्यासाठी मानसिक बळ  मिळेल आणि ते भयमुक्त व्हावेत    .
  2. कोरोना बाधितांना त्वरित वेंटिलेटर, ऑक्सिजन आणि मध्यम उपचार करिता हॉस्पिटल मध्य बेड त्वरित  उपलब्ध करावे .
  3. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोविड आणि नॉन कोविड रुग्णाचे उपचार हे सर्वच खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत व्हावेत. प्रथमतः यादीत समाविष्ट असलेले खाजगी हॉस्पिटलमध्ये त्वरित आंमलबजावनी करावी. तसेच उर्वरित सर्वच हॉस्पिटल या योजनेत समाविष्ट करावे. पालिकेची सनियंत्रण कमिटी आंमलबजावणी  कमिटी अधिक सक्षम व्हावी. ज्या अर्थी नागरीकांना या योजनेचा सहज आणि सुलभ पद्धतीने लाभ घेता येईल .

शासनाने याप्रकरणी त्वरीत निर्णय घेवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा अस्वस्थ नागरिक नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक  संस्थेच्या  माध्यमातून पुढील ७ दिवसात वाशी शिवाजी चौक ते अधीक्षक अभियंता सेक्टर -१७ वाशी, विभागीय आयुक्त कोकण भवन आणि   पालिका आयुक्त नवीन मुख्यालय बेलापूर  यांच्या कार्यलयांपर्यंत सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून संस्थेचे प्रमुख सहकारी यांस सोबत लाँग मार्च काढू, असा इशारा दशरथ भगत यांनी दिला  आहे.

=====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा