त्वरित अहवाल मिळणारी अँटिजेन चाचणी आजपासून सुरू

नागरिकांना मोफत अँटिजेन चाचणी मोफत उपलब्ध होणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १६ जुलै २०२०

कोव्हिडच्या जलद तपासणीच्या दृष्टीने ३० मिनिटात तपासणी अहवाल मिळणारी प्रतिजन चाचणी (अँटिजेन टेस्ट)  सुविधा तात्काळ सुरू करण्यात आली असून आज महानगरपालिकेच्या वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड रूग्णा लयात अँटिजेन चाचणी करण्यास प्रारंभ झाला आहे.महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तशा प्रकारचे निर्देश आरोग्य विभागास दिल्यानंतर आजपासून नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत ही एंटीजन टेस्ट विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

  • अँटिजेन चाचणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रूग्णालयाप्रमाणेच नेरूळ व ऐरोली रूग्णालयात ‘कोव्हीड १९ अँटिजेन टेस्टिंग सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. याव्दारे अर्ध्या तासात तपासणी अहवाल मिळणार असल्याने महानगरपालिकेच्या कोव्हीड रूग्ण शोध मोहिमेला गती लाभणार आहे. तसेच रूग्णाची माहिती लवकर प्राप्त होऊन त्याचे लगेच विलगीकरण करण्यात येऊन त्याच्यावर उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. कमी कालावधीत अहवाल प्राप्त होऊन लगेच उपचार सुरू करता येणारी ही अँटिजेन चाचणी सुविधा नवी मुंबईतील कोरोना प्रसारावर प्रतिबंध आणण्यासाठी अत्यंत  उपयुक्त ठरणार आहे.

अभिजीत बांगर नवी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त
https://www.aviratvaatchal.com/…/abhijit-bangar-ias-new-nm…/

  • कोव्हीड सदृष्य लक्षणे असणा-या व्यक्ती तसेच कोव्हिड १९ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्ती (High Risk Contact) यांची महानगरपालिकेमार्फत प्राधान्याने अँटिजेन टेस्ट विनामूल्य करण्यात येणार आहे. सध्या महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या ३ रूग्णालयांच्या ठिकाणी ‘कोव्हीड १९ अँटिजेन टेस्टिंग सेंटर’ सुरू करण्यात येत असून नागरिकांना घरापासून जवळ ही सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने २३ नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी देखील अँटिजेन टेस्टिंग सेंटर सुरू करणेबाबत आयुक्तांमार्फत आरोग्य विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत.

 नवी मुंबई महानगरपालिकेकडे सध्या ४० हजार अँटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध असून आणखी ६० हजार किट्स मागविल्या जाणार आहेत. शासनाकडेही १ लाख किट्सची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोव्हिड १९ तपासणीचा वेग वाढविण्यासाठी शासकीय तसेच खाजगी लॅबमधील तपासण्यांची संख्याही वाढविली जाणार असून त्यादृष्टीने आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाहीस जलद  प्रारंभ करण्यात आलेला आहे.


इतर बातम्यांचाही मागोवा