लॉकडाउन: फीसाठी दबाव टाकल्यास शाळांवर कठोर कारवाई

नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ  यांचा खासगी शाळांना इशारा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ११ जून २०२०

कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कामधंदेही मोठय़ा प्रमाणात ठप्प पडल्यामुळे सर्वसामान्य नागमरिकांवर कमालीचा आर्थिक ताण पडला आहे. एकीकडे कोरोनाचे आक्रमण सुरू असतानाच काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या थकलेल्या फी वसूलीसाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे. यामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. शाळांच्या या मनमानी कारभाराचा नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात फीसाठी पालकांवर दबाव टाकणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा,महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. जून महिन्यातही शाळा उघडण्याची चिन्हे नसून ऑनलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. मात्र त्याआधीच अनेक खासगी शाळांनी पालकांना फोन करून मागील शैक्षणिक वर्षातील राहिलेली फी तसेच आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या फीबाबत सतत विचारणा सुरू केली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे त्रस्त झालेल्या पालकवर्गाला शाळेच्या मनमानी कारभाराचा मनस्ताप होवू लागला आहे. याप्रकरणी पालकांनी आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे.

सध्या नागरिकांची आर्थिक आणि मानसिक परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारनेदेखील फी बाबत आदेश काढून नागरिकांवर फी वसूलीसाठी दबाव न आणण्याचे आदेश खासगी शाळांना दिले आहेत. यापार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीदेखील शहरातील खासगी शाळांना फी वसूली न करण्याबाबत आदेश दिले असून नागरिकांवर दबाब टाकणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मिसाळ यांनी शैक्षणिक संस्थांना दिले आहेत.

एखाद्या शाळेने फीसाठी दबाव टाकल्यास संबंधित शाळेची तक्रार पालकांनी महापालिकेच्या शैक्षणिक विभागाकडे करावी. अशा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

=================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा