अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई,9 जून 2020 :
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बुधवार 10 जून 2020 रोजी बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक उद्या रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्याचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 11 जून 2020 रोजी या विभागांत कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
———————————————————————————————————————————