कोरोना संसर्ग : तुर्भे, खैरणे, ऐरोली विभागांमध्ये 2400 हून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 8 जून 2020

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ज्या भागात अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत अशा कंन्टेनमेंट  कोव्हीड 19 विषयक तपासणी शिबिरे राबविण्यात येत असून आज 4 ठिकाणी झालेल्या मास स्क्रिनींगमध्ये 2414 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

एखाद्या नागरिकामध्ये तापाची लक्षणे आढळून आल्यास पल्स ऑक्सिमिटरने त्याच्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत असून एखाद्या नागरिकामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब टेस्टींग करण्यात येत आहे.

खैरणे भागातील मास स्क्रिनींगमध्ये महानगरपालिकेच्या नागरी आऱोग्य केंद्रासह डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 425 नागरिकांची कोव्हीड 19 च्या अनुषंगाने तपासणी केली. त्याचप्रमाणे सेक्टर 2 ऐरोली येथेही ऐरोली नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 174 नागरिकांची कोव्हीड 19 तपासणी केली.

चिंचपाडा ऐरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मास स्क्रिनींग शिबीरात 344 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर हनुमान नगर तुर्भे भागातही मास स्क्रिनींग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्रासह अमृत प्रेरणा सेवाभावी संस्थेच्या वैद्यकीय समुहाने 1471 नागरिकांची मास स्क्रिनींग तपासणी केली.

9 जून रोजीही सेक्टर 20 तुर्भे, हनुमान नगर तुर्भे, सेक्टर 26 तुर्भे, सेक्टर 1 ऐरोली व चिंचपाडा ऐरोली अशा 5 ठिकाणी मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा