कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी नवी मुंबईत प्रयोगशाळा सुरू करा

नवी मुंबई भाजप नेते भरत जाधव यांचे राज्यपालांना निवेदन

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरत जाधव  यांच्या मागणीचा उल्लेख

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १९ मे २०२०

सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तातडीने नागरिकांच्या करोना विषयी चाचण्या करून जलदगतीने अहवाल प्राप्त व्हावेत,यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासानाला शहरातच प्रयोगशाळा सुरु करण्याबाबत मान्यता द्यावी,यासाठी भाजपचे नवी मुंबईतील नेते भरत जाधव यांनी राज्यपालांना निवेदन दिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातही भरत जाधव यांच्या मागणीचा उल्लेख करीत नवी मुंबईत तातडीने प्रयोग शाळा सुरू कऱण्यास मान्यता द्यावी अशी  मागणी केली आहे.

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १८ मेपर्यंत नवी मुंबईतील कोरोबा बाधीत रुग्णांचा आकडा एक हजारपेक्षा अधिक नोंदला गेला असून आतापर्यंत ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोरोना बाधितांच्या चाचण्या करून त्या मुंबईला पाठविण्यात येत आहे. मात्र त्यांचा अहवाल येण्यास अनेक दिवस लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यापार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातच टेस्ट लॅब सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगत भरत जाधव यांनी राज्यपाल,मुख्यमंत्री तसेच महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. नवी मुंबईतील भाजपचे पहिले वहिले नगरसेवक राहिलेल्या भरत जाधव यांच्या पत्राची दखल घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यापत्रात भरत जाधव यांच्या नावाचा उल्लेख करीत करोना विषाणूच्या तपासणीसाठी नवी मुंबई साठी स्वतंत्र टेस्ट लॅब सुरू करण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, नवी मुंबईकरांचे आरोग्य आबाधित राखण्यासाठी तसेच करोना विषाणूचा कायमचा बिमोड करण्यासाठी नवी मुंबईत तातडीने कोरोना चाचण्यासाठी प्रयोगसशाळा सुरू करावी, अशी मागणी माजी नगरसेवक भरत जाधव आणि माजी नगरसेविका कविता जाधव यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

=====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा