नवी मुंबईत आज ६ रुग्णांची भर
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई,१९ एप्रिल २०२०
नवी मुंबईत आज प्राप्त झालेल्या कोविड-१९ च्या टेस्ट रिपोर्टमध्ये ६ जण पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ठाणे पोलीस आय़ुक्तालयामध्ये कार्यरत असलेल्या आणि नवी मुंबईत रहात असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या ६६ झाली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत असलेले ४० वर्षीय कॉन्स्टेबल घणसोली येथील रहीवासी आहे. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांच्या पत्नीचे टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आलेले आहेत. त्यांच्या सोबतच २३ वर्षीय आणि २९ वर्षीय अशा दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचे कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांची घरे इलठणपाडा, दिघा येथील इमारतीत आहेत. मात्र ते तेथे रहात नसल्याची माहिती महापालिकेने दिली.
- अविरत वाटचाल: पनवेलमध्ये भाजीपाला थेट नागरिकांपर्यंत
https://youtu.be/04wF7XpOGGM
हे तिन्ही पोलीस कर्मचारी ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना कोरोनाची लागणही ठाण्यातील पॉझिटीव्ह सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच झालेली असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
- अविरत वाटचाल : पेज लाइक करा. शेअर करा.
https://bit.ly/34IyLB9
हे तिन्ही पोलीस कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून ठाण्यातच कार्यरत असूनही नवी मुंबई महापालिकेच्यावतीने खबरदारी म्हणून घणसोली, दिघा येथील परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
- दरम्यान, इतर रुग्णांमध्ये एक घणसोली मधील रहीवासी असलेल्या आणि मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात डॉक्टर असलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करताना लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे याशिवाय दुसरी व्यक्ती नेरुळ सेक्टर २० येथील रहिवाशी, जे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर मुंबई क्षेत्रात वाहनचालक आहेत. तर तिसरी व्यक्त सानपाडा सेक्टर १९ मधील ६० वर्षीय महीला आहे. त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
========================================================
इतर बातम्यांचाही मागोवा