एपीएमसीतील तीन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद रहाणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ९ एप्रिल २०२०
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला, फळ, कांदा बटाटा मार्केट ही तीनही मार्केट ११ एप्रिल पासून पुढिल आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. बाजार समिती सचिवांनी याबाबतची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भाजीपाला व्यापारी महासंघ, फळ बाजारातील फ्रंट ऑफ युनायटेड  फ्रुटस असोसिएशन, कांदा बटाटा आडत व्यापारी संघाने बाजार समितीकडे ही मार्केट बंद ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.
  • रेल्वेने केले २५०० डब्यांचे अलगीकरण कक्षात रुपांतर
    https://bit.ly/3dZ4Etj
एपीएमसीतल्या मसाला मार्केटमध्ये एका व्यापा-याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. मात्र हा व्यापारी मुंबई मध्ये वास्तवास आहे. यामुळे एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, अडते, माथाडी कामगार धास्तावले आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्यापा-यांनी बाजार समितीकडे मार्केट बंद ठेवण्याबाबत मागणी केली होती.
  • शिवभोजन पुढील ३ महीने पाच रुपयांत मिळणार
    https://bit.ly/3aR9eYJ
=====================================================
  • इतर बातम्यांचाही मागोवा