परिस्थिती पाहून लॉकडाउन उठविण्याबाबत निर्णय घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 7  एप्रिल 2020

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.  इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा 5.50 लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

  • नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई
    https://bit.ly/39irGYI

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मंत्रिपरिषदेची बैठक आज व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. या बैठकीत प्रारंभी कोरोना साथीला रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सुचना केल्या.

  • पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
    https://bit.ly/2U5Jnq1

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे  प्राधान्याने ती करण्यात येईल असे सांगितले.  होमगार्डबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.

कोरोना : महाराष्ट्राची सद्य:स्थिती

  • महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे 5.99 इतका आहे. मरण पावलेल्या 11 रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.
  • एकूण 17563 सॅम्पल्स तपासले असून 15808 निगेटिव्ह आहेत.
    महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
  • मुंबईमध्ये सर्वाधिक 525 रुग्ण असून 34 मृत्यू आहेत.  त्या खालोखाल पुणे येथे 131 रुग्ण व 5 मृत्यू तसेच ठाणे विभागात 82 रुग्ण व 5 मृत्यू आहेत.
  •  महाराष्ट्रातील एकंदर 11 कोटी 19 लाख 66 हजार 637 लोकसंख्येपैकी 868 कोरोनाचे रुग्ण आढळले असून प्रत्येक 10 हजार लोकसंख्येमागे 0.077 असे रुग्ण आहेत.
  • आढळलेल्या रुग्णांमध्ये 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिला आहेत.  मृत्यू पावलेल्यांमध्ये 39.75 टक्के पुरुष आणि 13.25 टक्के महिला आहेत.
  • दहाव्या आठवड्यात भारतात 4125 रुग्ण आढळले.  इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत 1 लाख 22 हजार 653, फान्समध्ये 37 हजार 145, जपानमध्ये 1 हजार 693 आणि चीनमध्ये 81 हजार 601 अशी आकडेवारी आहे.
  • सध्या राज्यात 3 लाख 2 हजार 795 एन-95 मास्क, 41 हजार 400 पीपीई, 10 हजार 317 आयसोलेशन बेड, 2 हजार 666 आयसीयू बेड आणि 1 हजार 317 व्हेंटिलेटर्स आहेत.

=====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा