कोरोना updates : फेक लिंकपासून सावधान रहा

नवी मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ एप्रिल २०२०

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे फेकलिंक व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा काही लिंकची माहिती नवी मुंबई पोलिसांच्यावतीने जाहिर करण्यात आली असून अशा लिंकपासून सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

रेल्वेने केले २५०० डब्यांचे अलगीकरण कक्षात रुपांतर
https://bit.ly/3dZ4Etj

 त्यामध्ये प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2020 मध्ये नोंदणी करून महिन्याला 3500 रूपये देण्याचे अमिष दाखवणारी लिंक सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. मोफत नेटफिक्स – यासाठीची लिंक ओपन केल्यानंतर ती 20 लोकांनी किंवा 5 ग्रुपवर पाठविल्यास मोफत नेटफिक्स मिळेल असे सांगण्यात येते. काही मोबाईल सेवा देणा-या कंपनीकडून मोफत रिचार्ज मिळणार असल्याचे संदेश फिरत आहेत.
‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62

ईएमआयची तारिख वाढवून दिली जाईल तुमच्या मोबाईवर आलेला ओटीपी शेअर करा असे सांगून त्यांच्या खात्यातून रक्कम काढली जाते.

पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1

अशा लिंक ओपन करू नयेत तसेच आपला ओटीपी शेअर करू नये, अनोळखी अपस डाऊनलोड करू नयेत असुरक्षित वेब पेज तसेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर टाळावा असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. अशा संशयित लिंक बाबत WWW.reportphishing.gov.in वर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा