corona updates: नवी मुंबईत ३ नवीन रुग्ण आढळले,आज एकाचा मृत्यू

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, ५ एप्रिल २०२०

कोरोना विषाणूची लागण झालेले ३ नवीन रूग्ण आज नवी मुंबईत आढळून आले आहेत.  त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता  २८ झाली आहे. आज आढळून आलेल्या तिघांपैकी  नेरुळ इथल्या एका ७२ वर्षिय रुग्णाचा खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित दोघांमध्ये घणसोली इथली ३९ वर्षिय महिला आणि नेरूळ इथल्या ७० वर्षिय नागरिकांचा समावेश आहे. नवी मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमूखी पडलेल्यांची संख्या २ झाली आहे.
आतापर्यंत ११७ नागरिकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली आहे त्यापैकी ७९ अहवाल नकारात्मक आले असून २८ अहवाल सकारात्मक आले आहेत. तर १० तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.

  • नवी मुंबईत नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देणार
    https://bit.ly/33PsyCJ

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा