कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्णय घेतल्याची व्यापाऱ्यांची माहिती
एपीएमसीत अन्नधान्याचा मुबलक साठा
आवश्यकतेनुसार अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार
- अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
- नवी मुंबई, २३ मार्च २०२०
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाशी येथील एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि एपीएमसी संचालक मंडळाने घेतला आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला आणि फळ मार्केट २५ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत बंद राहणार आहे.
आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात १४४ कलम लागू
https://bit.ly/33AdDfQ
सध्या कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० ते ६० गाड्या कांदा बटाटा शिल्लक आहे. माथाडी कामगार गावाला गेले आहेत. तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळूंज यांनी दिली.
‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62
उद्या २४ मार्च रोजी भाजीपाला तसेच कांदा बटाटा मार्केट सुरू राहणार असून २५ मार्च रोजी पाडव्याची सुट्टी आहे. भाजीपाला मार्केटमध्ये दिवसाला ६०० ते ७०० गाड्यांची आवक होत असते. त्यामुळे हजारो ग्राहक, विक्रेते, खरेदीदार यांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून २५ मार्च ते ३१ मार्चपर्यंत एपीएमसी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती भाजीपाला मार्केट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलाश ताजणे यांनी दिली.
एसटी प्रवासासाठी ज्येष्ठांच्या सवलत स्मार्ट-कार्डला महिनाभर मुदतवाढ
https://bit.ly/3a6wvW7
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबई आणि आजुबाजूच्या परिसराला पुढचे काही दिवस पुरेल इतका अन्नधान्याचा पुरवठा केला गेला आहे. सध्या मार्केटमध्ये अन्नधान्याचा साठा पुरेशा प्रमाणात असून आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती धान्य मार्केटच्या व्यापा-यांनी दिली.
पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1
========================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा