कोरोनाविरुद्ध लढाई : संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची गरज

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे आवाहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २३ मार्च २०२०

कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे याची गांभीर्याने दक्षता घ्याल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला आज केले.

आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात १४४ कलम लागू
https://bit.ly/33AdDfQ

  • कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी लोकं रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहे याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

जनता कर्फ्यू : नवी मुंबईत शुकशूकाट
https://bit.ly/3bfdWzc

  • इतर देशात गंभीर स्थिती आहे त्या स्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन नागरिकांनी दक्षता घेतली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आपणही गांभीर्याने घ्यायची गरज आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62

  • दरम्यान अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडा. नाहीतर घराबाहेर पडू नका. केंद्र व राज्य सरकारने जे आवाहन केले आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सरकारी यंत्रणेला पुर्णपणे सहकार्य करावे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

एसटी प्रवासासाठी ज्येष्ठांच्या सवलत स्मार्ट-कार्डला महिनाभर मुदतवाढ
https://bit.ly/3a6wvW7

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा