गर्दी टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी होणार

विभागीय आयुक्त शिवाजी दौड यांची माहिती

कोरोना पार्श्वभूमीवर कोकण विभागात सज्जता

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २१ मार्च २०२०

मुंबई शहर आणि उपनगरात प्रवास करणाऱ्या वाहतूकीस प्रतिबंध व्हावा यासाठी आणि रेल्वेची गर्दी कमी व्हावी यासाठी प्रत्येक लोकल स्थानकावर प्रवाशांची तपासणी  केली जाईल आणि त्यानंतर त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येईल. यासाठी रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस  यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आले आहेत,अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.

राज्यात आणखी १२ जण करोना बाधित
https://bit.ly/3dfCuKe

आज कोकण भवन येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यावेळी कोरोना प्रतिबंधक उपाय योजना संदर्भात विविध बाबींचा आढावा घेतला.

  • राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोकण विभागातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय, पॅरामेडिकल महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालयातील अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सेवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील आदेश येई पर्यंत कोरोना प्रतिबंधक नियंत्रण कामासाठी घेण्यात येणार आहेत.  यासाठी संचालक आरोग्य यांनी आवश्यक प्रशिक्षण द्यावे असे निर्देश आज दौंड यांनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द
https://bit.ly/3dcjooe

जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेल्या आवश्यक सेवा फक्त सुरु राहणार आहेत. अन्य सेवा सक्तीने बंद करण्यात याव्यात असे निर्देश त्यांनी दिले आहेत. असे न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

  • अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. कोकण विभागात येणारे सर्व प्रवेशमार्ग सील करण्यात आलेले असून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती यांची तपासणी नाक्यावरच तपासणी केली जाईल आणि तेथील अधिकाऱ्याला आवश्यक वाटल्यास ते आत येण्याची परवानगी देतील. या सोबतच सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये नमूद करणाऱ्या सेवा या फक्त सुरु असणार आहेत. कोकणातील जनतेने यासाठी प्रतिसाद द्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1

मुंबईतील जे.जे. हॉस्पीटलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले असून रक्तदात्यांनी रक्तदानासाठी यावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

 

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा