शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी राबवला स्तुत्य उपक्रम
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २१ मार्च २०२०
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च रोजी केंद्र आणि राज्य सरकारने जनता कर्फ्यु घोषित केला आहे तसेच ३१ मार्च पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना नवी मुंबईच्या वतीने शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनानुसार नेरुळ येथे विविध ठिकाणी सफाई कामगार, असंघटित कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन अन्नदान करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द
https://bit.ly/3dcjooe
- यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर,शहर प्रमुख विजय माने, नगरसेवक काशिनाथ पवार,समीर बागवान विभाग प्रमुख तथा परिवहन समिती सदस्य, किशोर पाटील-माजी परिवहन समिती सदस्य,अशोक येवले- उपविभाग प्रमुख,दिनेश कोठारी- उपविभाग प्रमुख, दिपक शिंदे- उपविभाग प्रमुख,संजय चव्हाण-शाखा प्रमुख,विश्वास गुजर- शाखाप्रमुख , आकाश ठाकुर-शाखाप्रमुख,संदिप मतकर,विजय आंब्राळे,रामचंद्र म्हात्रे, दिलीप घरत,कावळे सर यांनी नेरुळ परिसरातील सफाई कामगार तसेच नाका कामगारांची भेट घेऊन त्यांना आवश्यक जेवणाचे वाटप केले.
- अन्नाचे वाटप करताना शासनाच्या सूचनांचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत लोकांची गर्दी होऊ न देता शांततेने जेवणाचे वाटप करण्यात आले.
पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1
सध्या कोरोना विषाणूमुळे नाका कामगारांच्या हाताला काम नाही त्यामुळे नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याने शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत गोरगरीब नाका कामगारांची तसेच सफाई कामगारांची गैरसोय होऊ नये त्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना अन्न धान्य अथवा जेवण वाटप करण्यात यावेत अशी शिवसेना नेत्यांना आदेश दिले आहे. त्या नुसार नवी मुंबईतील गरजू नागरिकांना आवश्यक अन्न पदार्थ वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये आज मध्यरात्रीपासून बंद
https://bit.ly/3dqFROG
दरम्यान, या बंदच्या काळात कष्टकरी कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी रोज दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता अशाप्रकारे जेवणाचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी दिली.
====================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा