चित्रपटसृष्टीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १५ जानेवारी २०२०

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत चित्रपटसृष्टीत प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ऑडीशन, मार्गदर्शन कार्यशाळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

ही कार्यशाळा विनामुल्य स्वरुपाची असेल. या कार्यशाळेसाठी चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, छायाचित्रकार, अभिनेते यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. चित्रपटसृष्टीत नव्याने प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून ऑडीशन कसे द्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यशाळेत इच्छूकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन बिभीषण चवरे, प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या ०२२-२४३०८८७६ या क्रमांकावर संपर्क करावा.

====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा