अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, १ डिसेंबर २०१९:
तीन हात नाका येथे मेट्रोच्या “ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या वृक्षतोडीवर नौपाडा पोलीस “ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापौर नरेश म्हस्के यांनी या विषयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वृक्षप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील यांनी ठेकेदार आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
मेट्रोच्या ठेकेदाराकडून रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षतोडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करमाऱ्या ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी देखील अशा प्रकारे परस्पर रात्रीच्या वेळी झाडे तोडण्याच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हा प्रकार घडल्याबाबत प्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश वृक्षप्राधिकरण विभागाला दिले. त्यानुसार रात्री उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास करुन पाठपुरावा करण्याच्या सूचनाही महापौर यांनी दिल्या आहेत.
================================================
अविरत वाटचाल पेपर
====================================================
इतर बातम्यांचाही मागोवा