नवी मुंबई महानगरपालिका कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वीच बोनस

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,२३ ऑक्टोबर २०१९

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या कत्रांटी कामगारांना बोनसचे वाटप करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिवाळीपूर्वीच म्हणजे २४ ऑक्टोबरपर्यंत कामगारांचे बोनस देण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये कंत्राटी स्वरुपातील सफाई कामगारांच्या उत्तम योगदानाचा उल्लेख नवी मुंबईचा गौरव केला जात असताना नेहमीच आदरपूर्वक केला जातो. त्यामुळेच किमान वेतनाचा ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच तेरा महिन्यांचा फरक देणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महानगरपालिका म्हणून नावजली जाते.

दिवाळीच्या काळात कंत्राटी कामगारांना लेव्ही अंतर्गत 8.33 टक्के बोनस रक्कम व 6 टक्के रजा रोखीकरण देयके अदा करण्यात येतात. ही रक्कम दिवाळीपूर्वी कामगारांच्या हातात मिळावी जेणेकरून त्यांना दिवाळीसण उत्साहात साजरा करता यावा याकरीता महापालिका प्रशासन सक्षम असून त्या अनुषंगाने कंत्राटी कामगारांना बोनस व अनुषांगिक रक्कम अदा करण्यात आली आहे.

=====================================

बघा पोहे कसे बनतात (पेणचे प्रसिद्ध पोहे)

===============================