अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई,१७ ऑक्टोबर २०१९
21 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत प्रत्येक मतदाराने बजवावा याकरिता मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या मतदान जनजागृतीपर बाईक रॅलीचे आयोजन 151 बेलापूर विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आली होती. अरेंजा कॉर्नर सर्कल से-17 वाशी ते महापालिका मुख्यालय इमारत से.15 ए, सीबीडी बेलापूर पर्यंत करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने लेट्स सेलिब्रेट फिटनेस ग्रुपचे बाईकर्स तसेच रॉबिनहूड आर्मी आणि वन राईड नवी मुंबई या समुहांचे बाईकर्स उत्साहाने सहभागी झाले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील पर्यवेक्षकांनीही रॅलीत सहभाग घेतला. विशेषत्वाने मतदानाचे महत्व युवा मतदारांमध्ये प्रसारीत व्हावे व युवकांसह सर्वांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचावा याकरिता आयोजित या मतदान जनजागृती बाईक रॅलीमध्ये 100 हून अधिक दुचाकीस्वारांनी हेल्मेटसह वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत रॅली यशस्वी केली.
मतदान करणे हे आपले कर्तव्य असून योग्य उमेदवार निवडून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे लक्षात घेऊन प्रत्येक मतदाराने 21 ऑक्टोबरला हक्काने मतदान करावे असा संदेश रॅलीमध्ये मोठया प्रमाणावर सहभागी बाईकर्सनी प्रसारीत केला.
========================================================
इतर बातम्यांचाही मागोवा