पनवेलमधून भाजपचे प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पनवेल, ३ ऑक्टोबर २०१९:

 पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ. प्रशांत ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या साथीने शक्तीप्रदर्शन करीत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणार, असा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्ज दाखल करतेवेळी आ.प्रशांत ठाकूर यांच्यासोबत माजी खा. रामशेठ ठाकूर आणि पक्षाचे अन्य मान्यवर नेते उपस्थित होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांदेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत, अभिनंदन आणि औक्षण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरांबरोबरच ग्रामिण भागाचाही झपाट्याने विकास करण्यावर भर देत आहेत. प्रचारासाठी दिवस कमी राहिले आहेत, सहकारी म्हणून तुम्ही मला साथ द्याल, घरोघरी जाऊन प्रचार करा. आपल्याला निवडणुकीची आदर्श आचारसंहिता पाळून काम करायचे आहे. आपल्या सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवा. – आ. प्रशांत ठाकूर 

=====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा