काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, ९ जुलै २०१९:

भारतीय जनता पार्टीच्या देशव्यापी सदस्यता अभियाना अंतर्गत नाशिक येथील निफाड तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समता परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

  • यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मणराव सावजी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशबाबा पाटील, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादाभाऊ जाधव आणि निफाड तालुका अध्यक्ष संजयजी वाभळे उपस्थित होते. पंचायत समितीचे उपसभापती गुरूदेव कांदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निफाडच्या महिला अध्यक्ष अश्विनी मोगल, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नामदेवराव शिंदे, राष्ट्रवादीचे माजी तालुका उपाध्यक्ष हरिष झालटे, मनसेचे माजी जिल्हा सरचिटणीस आशिष फिरोदिया यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.

================================================

इतर बातम्यांचाही मागोवा