सायन-पनवेल महामार्गाची वाहतूक विस्कळीत

  • खारघर येथे नाल्याचे पाणी रस्त्यावर
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ८ जुलै २०१९:

सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून खारघर येथे रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक दुपारी कमालीची मंदावली आहे. कोपरी पुलाजवळील नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या असून वाहतूक हळूहळू सरकत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिली.

 

  • खाऱघर परिसरातील कोपरील पुलाजवळील नाला आज सकाळपासूनच ओसंडून वाहत आहे. नाल्यातील कचरा वाहून तो रस्त्यावर आला आहे. त्यामुळे खारघर येथे सायन –पनवेल महामार्ग पाण्याखाली गेला असून दोन्हीकडील वाहतूक मंदावली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूकदेखील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. एकच लेन सुरू असल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी झाली आहे. मात्र हळूहळू वाहतूक पुर्ववत करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी दिली.
  • पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा निचरा होईल आणि वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.

==================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा