अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ७ जून २०१९:
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली अनेक स्वच्छतागृहे बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे नेरुळ परिसरात बंद असलेली शौचालय पुन्हा सुरू करावीत अशी मागणी नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- मुंबई पुणे महामार्गावर नेरूळ येथील उड्डाणपुलाची खाली मुंबईच्या दिशेने जाताना महिला व पुरुषा साठी तीन स्वच्छतागृह स्वच्छता अभियान अंतर्गत विनामूल्य सुरू केली होती.परंतु ही स्वच्छतागृह गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे नागरिक उघड्यावरच नैसर्गिक विधी उरकत असल्याचे विरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.
- शहरातील अनेक स्वच्छतागृहे अस्वच्छ असून विद्युत दिवे बंद असणे, पाण्याची सुविधा नसणे त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. याबाबत मनपाचे उपायुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता,याबाबत चौकशी करून कारवाई करतो असे सांगितल्याचे म्हात्रे म्हणाले.
======================================================
इतर बातम्यांचाही मागोवा