गडचिरोलीत भूसुरुंगस्फोटात 16 जवान शहीद

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 1 मे 2019 :

जिल्हयातल्या कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगस्फोटात 16 जवान शहीद झाले आहेत. या हल्यात खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.

1 मेच्या मध्यरात्री दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी हा भूसुरुंगस्फोट घडवून आणला. मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. आज सकाळी जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना सकाळी 11 च्या सुमारास जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला.