अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ११ एप्रिल २०१९:
वाशी सेक्टर ८ येथील सागर विहार परिसरातील पंप हाऊस येथे पादचारी पूलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. रात्री ८ च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई सीएसएमटी परिसरात पादचारी पूल कोसळून सात नागरिकांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच आज घडलेल्या या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पादचारी पुलांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
- वाशी सेक्टर ८ येथील पंप हाऊस परिसरात पादचारी पुलाला मोठे भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेत सर्वेश पाल (२०) आणि जितेंद्र पाल (२३) हे दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी दिली.
सदर पादचारी पूल सुमारे २० ते २२ वर्षांचा जूना आहे. पादचारी पूल कोसळल्यामुळे शहरातील इतर पादचारी पूल आणि ब्रीजच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
========================================================
इतर बातम्यांचा मागोवा – व्हिडिओ