नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक होळी साजरी करा

आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे , १९ मार्च २०१९:

ठाणेकर नागरिकांनी होळीच्या सणाला वृक्षतोड, पाण्याच्या होणार अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.दरम्यान होळीच्या सणासाठी कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे टँकर देण्यात येऊ नयेत असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • होळी सणाच्या निमित्ताने मोठया प्रमाणात पाण्याचा गैरवापर करण्‍्यात येतो. या पार्श्वभूमीवर या दिवशी कोणालाही पाण्याचे टँकर न पुरविण्याचे आदेश आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत.त्याचप्रमाणे ठाणे शहरातील सर्व्हिस स्टेशनलाही तशा सूचना देण्याविषयी त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना निर्देशित केले आहे.

 

  • दिवसेंदिवस पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेवून नागरिकांनी वृक्षतोड टाळावी. तसेच पाण्याचा बेसुमार वापर करून पाणी वाया घालवू नये. त्याचबरोबर बेसावधपणे रंगाचे फुगे डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून होळीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

========================================================

इतर बातम्यांचाही  मागोवा