अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ८ जानेवारी २०१९:
सानपाडा से १४ येथील मुख्य प्रदर्शनीय भागावर असलेल्या मोकळया भूखंडावर गेल्या कित्येक दिवसांपासून भंगार वाहने ठेवण्यात आल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. वारंवार महापालिका प्रशासनाला कळवूनही वाहने हटविण्याबाबत कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे महापालिकेचे याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि नगरेविका वैजयंती भगत यांनी धूळ खात पडलेले वाहन टो करून महापालिकेवर धडक दिली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी त्वरीत महापालिका मुख्यालयाचे मुख्य द्वार बंद केले. याप्रकरणी तातडीने तोडगा काढला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा नगरसेविका वैजयंती भगत आणि दशरथ भगत यांनी दिला.
- या प्रदर्शनीय मोकळा जागेवर सन. २०१८ ते २०१९ या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सदर भूखंडावर १० ते १२ भांगार वाहने टाकण्यात आली. ती वाहने तेथून काढण्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा करीत आहोत अद्याप काढण्यात आलेले नाही.त्यामुळे नगरनसेविका वैजयंती भगत, नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखील परिसरातील नागरिकांनी आज सकाळी १२ च्या सुमारास सानपाडा सेक्टर १३ मधील मोकळ्या मैदानात ठेवलेली एक गाडी टो करून महापालिकेत आणली. मात्र सुरक्षा रक्षकांनी महापालिका मुख्यालयाच्या मुख्य दरवाजावरच आंदोलनकर्त्यांना अडविले. यावेळी दशरथ भगत यांनी महापौर जयवंत सुतार यांना याबाबात माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती केली. स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून २ दिवसांत सदर भूखंडावरील वाहने उचलण्याचे आश्वासन दिले तसेच आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. स्थायी समिती सभापतींच्या आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले असून याप्रकरणी २ दिवसांत तोडगा निघाला नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करू, असा इशारा नगरसेविका वैजयंती भगत आणि माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी दिला.
=========================================================================================================================
मागील इतर बातम्यांचाही मागोवा
- सानपाड्यात जागो प्रशासन जागो आंदोलन