महापालिका लोकशाही दिनासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करा

  • 4 फेब्रुवारी रोजी होणार लोकशाही दिन

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई , ७ जानेवारी २०१८:

फेब्रुवारी महिन्याचा 4 फेब्रुवारी  रोजी होणाऱ्या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी १९ जानेवारीपर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहे. निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये आयुक्त, नवी मुंबईमहानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे अर्जाच्या वरील दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.

  • या अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे.
  • अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा.
  • अर्जादाराने संबंधित विषयाबाबत याआधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे.
  • याशिवायलोकशाही दिनामध्ये – न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल, सेवाविषयक -आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.
  • विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती नजोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत.
  • तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रशासनाने कळविले आहे.

लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्ले गांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबईमहानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील फॉर्मस् / अर्ज सेक्शनमधून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

=======================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींंच्या पुनर्विकासाबाबत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन.