सीवुडमध्ये रंगोतय बाल आनंद महोत्सव

 

  • शिवसेना सीवुड विभागप्रमुख संतोष दळवी व साई प्रेरणा मित्र मंडळातर्फे आयोजन

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, २५ डिसेंबर २०१८:

शिवसा प्रभाग क्रमांक १११ चे विभाग प्रमुख संतोष दळवी आणि साई प्रेरणा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सीवुड विभागातील सेक्टर ४६ येथे बाळ आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ डिसेंबर या काळात रंगणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन आज कऱण्यात आले.

पहिल्याच दिवशी मुलांसाठी चमचा लिंबू स्पर्धा, बादलीत बॉल टाकणे, धावणे स्पर्धा, सॅक रेसिंग स्पर्धा, बटाटा गोळा करणे स्पर्धा, मटका फोडी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना मुलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विशेष म्हणजे पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले.

  • आपल्या मुलांसाठी अशाप्रकारचे उपक्रम राबविल्यामुळे पालकांनी सीवुड प्रभाग क्रमांक १११ चे शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष दळवी यांचे आभार मानले. यावेळी उपशहरप्रमुख सौमित्र कडू,  उपविभागप्रमुख पंकज आवटे,  शाखा प्रमुख कुणाल गुरव, शाखा प्रमुख योगेश पारकर, उपशाखाप्रमुख अनिल मानकर, उपशाखाप्रमुख अनिल पाटील,  समाजसेवक दिपक आवटे, महिला संघटक कुंजन पाटील  आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 

 

  • दरम्यान, २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या काळात चित्रकला स्पर्धा, सकाळी १० ते १२ या काळात मुलांसाठी प्रश्न मंजुषा, सायंकाळी ४ ते ६ याकाळात जादुचे प्रयोग आणि सायंकाळी ७ ते ९ याकाळत समाजप्रबोधक शिवव्याख्याते प्रा. निलेश कोरडे यांचे  मोबाइलमुळे मुलांच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम आणि पालकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

२७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ याकाळात महिलांसाठी खास होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. तर ७ ते ९ या काळात बाळ आनंद महोत्सवात सहभागी झालेल्या आणि प्राविण्य मिळविलेल्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे विभाग प्रमुख संतोष दळवी यांनी सांगितले.

=========================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांसाठी हक्काचे व्यासपीठ