- केंद्र सरकारने प्रमाणपत्र दिल्याचे महापालिकेतर्फे जाहीर
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, १९ डिसेंबर २०१८:
ठाणे शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा केंद्र सरकारने केल्याची माहिती ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पथकाने गेल्या महिन्यात केलेल्या फेरतपासणी केल्यानंतर ठाणे शहर हागणदारीमुक्त असल्याचे पत्र महापालिकेस नुकतेच प्राप्त झाले आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाने ठाणे शहरात हागणदारी मुक्त योजना प्रभावीपणे राबविल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या त्रयस्थ संस्थेच्या पथकाने महापालिका क्षेत्रातील १७ ठिकाणाची दोन दिवसांपूर्वी आकस्मिक पाहणी केली होती. यामध्ये विटावा, शिवाजीनगर, गांधीनगर, समर्थनगर, वैतीबाई रामचंद्रनगर, रामबाग, पडवळनगर, रघुनाथनगर, वासुदेव बळवंत फडके मार्ग, कळवा मार्केट, खारेगाव मार्केट, शरीफा रोड, थिराणी विद्यामंदिर, शिवाई विद्यालय, आझाद इंग्लिश स्कूल, एसटी लौरेन्स स्कूल, डिसुझावाडी, कचराळी तलाव आदी ठिकाणांचा यामध्ये समावेश होता. या भागात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये पुरविण्यात आली आहेत.
- दर सहा महिन्याच्या अंतराने या त्रयस्थ पथकाकडून पाहणी केली जाते. त्यानुसार यापूर्वीही शहरातील काही भाग हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे, असे ठाणे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
======================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- एक धाव स्वच्छतेसाठी